गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):- गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दि.(१५) शनिवारी घडली. प्राजक्ता राजेश्वर शेडमाके वय (२२) धानापूर असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे.राहत्या घरीच काल दुपारी २ वाजताच्या दरम्यान प्राजक्ताने घरी कुणी नसल्याची संधी साधत गळफास घेत आत्महत्या केली.आज शवविच्छेदन करून अंत्यविधी पार पडणार आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहे.