मुलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन विश्वास हे गेल्या एक वर्षापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीचे असल्याने ते संकटात सापडले होते. याची माहिती मुलचेराचे ठानेदार अशोक भापकर यांना मिळताच त्यांनी पुढाकार घेत दुर्दर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला तात्काळ आर्थिक मदत केली.
देवनगर येथील अंजन विश्वास हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, आर्थिक स्थिती बेताची असल्याने उपचारासाठी आर्थिक अडचणी येत होती. सध्या त्यांच्यावर सेवाग्राम वर्धा येथे उपचार सुरू आहे. उपचारासाठी आर्थिक मदत आवश्यक असल्याने मूलचेरा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी काही रक्कम गोळा करून त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले.
यापूर्वी अंजन बिश्वास यांच्या उपचारासाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी सुद्धा आर्थिक मदत केली होती हे विशेष.