कोरची :- कोरची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोरची या संस्थेतील अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगष्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी दिक्षांत समारोहाचे आयोजन १७ सप्टेंबर रोज शनिवारला राजेश फाये, संवर्ग विकास अधिकारी यांचे हस्ते दिप प्रज्वलीत व विश्वकर्मा यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून समारोहाचे उदघाटन करण्यात आले होते.
दिक्षांत समारोह कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीभाऊ मडावी, शिल्प निदेशक, प्रमूख अतिथी चंद्रकांत ठेंगडी, शिल्प निदेशक व कार्यक्रमाचे मूख्य अतिथी व मार्गदर्शक राजेश फाये, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कोरची यांचे उपस्थितीमध्ये दिक्षांत समारोहाचे आयोजन करण्यात आले. हरीभाऊ मडावी यांनी राजेश फाये यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.
राजेश फाये, संवर्ग विकास अधिकारी, कोरची यांचे हस्ते उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रमूख पाहूणे म्हणून बोलतांना राजेश फाये यांनी प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत करुन चांगले कौशल्य् प्राप्त करावे की, ज्यामूळे परीवाराबरोबरच, समाज, राज्य्, व देशाची प्रगती होईल. भारत हा तरूणांचा देश असल्यामूळे आपल्या सारख्या तरूणांनी संस्थेतील गुरुजनांकडून जास्तीत कौशल्य प्राप्त करून आपण स्वयंभू बनावे. सर्वसामान्य जनतेला आपल्या कुशल कौशल्यामूळे लाभ होईल. आपण ज्या परीसरात राहतो तो परीसर स्वच्छ ठेवून निर्माण होणाऱ्या विषारी किटकांपासून संरक्षण प्राप्त करून घ्यावे. अशा प्रकारे स्वच्छतेचे महत्वही प्रशिक्षणार्थ्यांना पटवून दिले.
दिक्षांत समारोहाचे प्रास्तावीक भरत नैताम यांनी केले, व आभार प्रदर्शन घनशाम पारधे यांनी केले, व दिक्षांत समारोहाचा समारोप करण्यात आला. दिक्षांत समारोह यशस्वी करण्यासाठी विनोद दाते, शि.नि., एस. बी. सुखदेवे, एस. वाय. राऊत, एल. के. फुलबांधे, व संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांनी दिक्षांत समारोह यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.