कोरची:- कोरची तालुक्यातील बेळगाव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत मंगळवारी रात्री च्या दरम्यान जनावरांची तस्करी करणारे तस्कर बोलेरो पिकप मध्ये कोंबून अकरा जनावरे कत्तलीसाठी नेत असतांना बेडगाव पोलिसांनी नाकाबंदीच्या दरम्यान कोरची- बेळगाव रस्त्यावर पकडले. एम एच ४० बीजी ३८६६ क्रमांकाची बोलेरो पिकप मध्ये नऊ गायी व दोन बैल असे एकूण अकरा जनावरे आढळून आले.
वाहन चालक रामरतन दुमाने वय ४७ वर्ष रा. बर्डी दत्त मंदिर जवळ आरमोरी, तालुका आरमोरी, अरविंद मारभते वय ३२ वर्ष रा. गांधीनगर सावंगी, देसाईगंज ता. देसाईगंज हे दोघेही अवैधरित्या विनापरवाना निर्दयतेने वागणूक देऊन दाटीवाटीने कोंबून नऊ गायी व दोन बैल वाहतूक करत असल्याचे सापडून आले आहे. या दोघांनाही बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली. पोलिसांनी बघितले तेव्हा जनावरे भुकेने तहानेने व्याकूळ झाले असल्याचे व जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले.
पोलिसांनी बोलेरो पिकप चे कागदपत्रे व परवाना विचारणा केली असता परवाना व कागदपत्र मिळून आले नाही. तसेच नऊ गायी व दोन बैल असे एकूण अकरा जनावर यांना त्यांचे योग्य त्या पालन पोषणाकरिता तात्पुरता बेडगाव ग्रामपंचायतीच्या कोंडवाडात ठेवण्यात आले. सदर जनावरांची कोरची पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वपिल खंडाते, सहा.पशुधन विकास अधिकारी डॉ. महादेव ढाकणे यांचेकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच बुधवारी सायंकाळी या जनावरांचे योग्य ते पालन-पोषण करण्याकरिता बळीराम गोमाता सेवाभावी संस्था शिरसाळा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आले आहे.
प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६९ कलम ११(१)(a)(d)(e)(f) प्रमाणे तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम ३(१) १८१,सहकलम ५(a) ९,११ महाराष्ट्र प्राणी रक्षक अधि.१९७६ सुधारित २०१५ आनंद वे कोरची पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच या दोन्ही आरोपी व बोलेरो पिकप यांना तपास कामासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. अधिक तपास कुरखेडा पोलिस उपविभागीय अधिकारी साहिल झरकर, कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल नाणेकर करीत आहेत.