गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- सद्यस्थितीत गोंडपिपरी तालुक्यात वैनगंगा नदीत पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून आहे.अशातच दि.(१६) शुक्रवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान गोंडपिपरी-आष्टी च्या वैनगंगा नदीपात्रात एक अज्ञात इसम उडी मारत असल्याचे दिसताच नवीन पुलाची निर्मिती करण्यासाठी कामावर असणाऱ्या मजुरांनी अज्ञात इसमाला वाचवण्यासाठी धाव घेतली शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांच्यापर्यन्त पोहचण्याआधीच उडी घेतली.शुक्रवारी दिवसभर उडी घेणारा नेमका कोण चर्चा असताना. गोंडपिपरी येथील एक शिक्षक घरून दाळी करण्यासाठी केस कर्तनालयात सकाळी ९ वाजता गेलेले उशिरा पर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता ची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दिली.त्यानंतर गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी आपत्ती व्यवस्थापन पोलीस रेस्क्यू टीम ला सोबत घेत शोध मोहीम राबवली असता आज दि.(१७) सायंकाळी पाच च्या दरम्यान आष्टी इल्लूर जवळील ठाकरी गावालगत नदीकाठावर मृतदेह आढळला असून त्यांची ओळख पटली ते बेपत्ता असलेले शिक्षकच होते .मृतक रामचंद्र उराडे वय (५६) ते जिल्हा परिषद विहरगाव शाळेत कार्यरत होते .आष्टीचे ठाणेदार कुंदन गावडे यांनी मृतदेह पाठवण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली .रामचंद्र उराडे यांच्या पच्यात पत्नी ,दोन मुली,एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.ते शिक्षक मधुमेहाच्या त्रासाने ग्रासले होते त्रास असह्य झाल्याने जीवनयात्रा संपवल्याचा अंदाज बांधल्या जात आहे.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहे