घुग्घुस :-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा अंतर्गत शनिवार, १७ सप्टेंबर रोजी घुग्घुस येथील प्रयास सभागृहात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने स्टँडर्ड चार्टर्ड बँक व हॅबीटेट फॉर हुमॅनिटी फॉर इंडिया यांच्या माध्यमातून घुग्घुस येथील भूस्खलनग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर झोनचे व्यवस्थापक प्रबोद नायक, संदीप नक्सलवार, प्रमोद पटले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, माजी जिप. सभापती नितुताई चौधरी, भाजपाचे चिन्नाजी नलभोगा, पुनम शंकर, संजय तिवारी, विनोद चौधरी, विजय आगरे, विनोद खेवले, साजन गोहने, कुसुम सातपुते, सुचिता लुटे, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरणताई बोढे, बबलू सातपुते मंचावर उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वात भारत सरकार सेवा, सुशासन आणि अंत्योदयाच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे. याबरोबरच केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी सातत्याने मोदीजींची धडपडत असते. त्याचप्रमाणे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील राज्यासह जिल्ह्यातील शोषित, पिडीत, वंचित, निराधार आणि गरजूंच्या हाकेला ओ देण्यासाठी तत्पर असतात. आपल्या घुग्गुस येथील विकासात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. स्थानिक प्रश्नांसह जनतेच्या सेवेसाठी आदरणीय भाऊ आग्रही असतात. गत २६ ऑगस्टच्या दुर्घटनेविषयी कळताच सुधीरभाऊंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, प्रशासनाला मदतीच्या सुचना केल्या. आणि भाऊंच्या “दिला शब्द केला पुर्ण” या उक्तीप्रमाणे आज भाऊंनी स्टँडर्ड चार्टर्ड बँक व हॅबीटेट फॉर हुमॅनिटी फॉर इंडिया यांच्या माध्यमातून भुस्खलनग्रस्त बांधवाच्या कुटुंबीयांपर्यंत जीवनावश्यक किट स्वरूपात ही मदत पोहोचविली आहे. प्रास्ताविक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले.
आज रिनाताई गावतूरे यांचाही वाढदिवस असल्याने प्रसंगीच त्यांच्या हस्ते केक कापून त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदंड व निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भुस्खलनग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
संचालन अमोल थेरे व सचिन कोंडावार यांनी केले.
यावेळी राजेश मोरपाका, शाम आगदारी, सिनू इसारप, नितीन काळे, विक्की सारसर, गुड्डू तिवारी, वमशी महाकाली, हेमंत कुमार, शाम आरकिल्ला, शरद गेडाम, असगर खान, मधुकर धांडे, रोहित जैस्वाल, रोशन जैस्वाल, रमेश कोट्टेकोला, भास्कर कलवेणी, बंटी बघेल,
कृष्णा साहू, मेघराज लांजेवार, राकेश चिंताला, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर, शिला उईके व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.