गडचिरोली: जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो, त्या संकटावर मात करण्यासाठीच कुणीच मदत करित नाही, आपल्यालाच लढावे लागते. या सोबतच सध्या समाजात फॅशन झालेल्या रम, रमा, रमी या तीन ‘र’ पासून दूर राहिल्यास जीवनात यशस्वी होता येते, त्यामुळे युवकांनी या ‘र’ पासून दूर राहावे, असे आवाहन ॲड. दीपक चटप यांनी केले.कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. संजय ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, कृषी विज्ञान केंद्राचे तथा आत्माचे संचालक डॉ. संदीप कऱ्हाडे, ॲड. बोद्धी रामटेके, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दादाजी चापले, शरद पाटील ब्राम्हणवाडे, मनोहर हेपट, सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी शालिग्राम विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी दशेतच अनेक समस्या, अडथळे निर्माण होत असतात. त्यावर मात करण्याची क्षमता तयार करण्याची गरज आहे. सामान्य व्यक्तीच भरिव यश संपादन करित असते, तेच खरे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच समस्या व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता निर्माण करावी, असे आवाहन डॉ. अनिल चिताडे यांनी केले. यावेळी डॉ. संदीप कऱ्हाडे, ॲड. संजय ठाकरे, बोद्धी रामटेके आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ब्रिटिश सरकारची ४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारे, यासोबतच सामान्य जनतेच्या समस्या व प्रश्नांवर न्यायालयात लढणारे भूमी पूत्र ॲड. दीपक चटप यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंचल रोहणकर यांनी केले. संचालन मयूर मुनघाटे तर आभार जीवन भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी समाज सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
————————————————-
दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी
दर्गा ब्राम्हणवाडे, सुमित राऊत, युवराज पिल्लारे, अभय चचाणे, मृण्मयी भाकरे, आदित्य चापले, रोहन भोयर, आदिती कोटगले, लक्ष्मी मंगर, शहिजाता धामंदे, संतोषी भगत, क्रिश म्हशाखेत्री, समिर खेडेकर, श्रेया झंझाड, नेहा ढोरे, पर्व आरेकर, जयंद्र पांडव, अमन बोरकुटे, समिक्षा धंदरे, संचित उरकुडे, राम झंझाड, सोमेश्वर हुलके, हर्ष हुलके, समिक्षा हुलके, प्रतिक तुमडे, मृदुला चुनारकर, ट्विंकल चिमूरकर, प्रणय पोरटे, साक्षी रोहणकर, अनन्या ठाकरे, खुशी झोडगे, डेव्हिड राऊत, धिरज निंबोळ, रिद्धी पाचभाई, प्रियंका झाडे, संचित उरकुडे.
श्याम झंझाड, समिक्षा धानोरकर, वंशिका सहारे, खुशाल मंगर, धनराज चिमूरकर, मयूर सालोटकर, कल्याणी खेवले, तन्मय राऊत, विश्वदीप हुलके, अवंतिका खांडेकर, सेजल चौधरी, आयुष ठाकरे, वृषभ आंबटकर, स्पंदन म्हस्के, परिक्षित भोयर, श्रेयस झंझाड, अनन्या ठाकरे, अजिंक्य कुत्तरमारे यांचा समावेश आहे.
————————————————
व्यावसायिक अभ्यासक्रम गुणवंत
आचार्य पदवी प्राप्त कु. डॉ. स्नेहल वामन भोयर, डॉ. दीपक काशिनाथ गोंदोळे, कु. डॉ. मेघा अशोक सालोटकर (नरुले), डॉ. पंकज प्रभाकर नरुले, कु. डॉ. सुरेखा केशवराव हजारे (म्हशाखेत्री), कु. डॉ. वैशाली गंगाधर बोर्डे (विधाते) तर वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. सुमित श्रीरंग खेवले, डॉ. रोषण बापूजी गिरसावडे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या पल्लवी श्रीरंग खेवले यांचा समावेश आहे.