चंद्रपूर- या वर्षी संततधार पावसामुळे पुरपरिस्तितीमुळे अनेकांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळाली नाही.कधी डोंग्यातून तर कधी घनदाट जंगलातून नागरिकांना स्वताचा जीव धोक्यात टाकून गोंडपीपरि तालुका गाठावे लागत होते काहींना तर योग्यवेळी उपचार न मिळाल्याने जीव देखील गमवावा लागला कूडेसावली ,परसोडी ,आर्वी, सरांडी, वेजगाव ,तोहगाव, वामनपल्ली, पारडी या गावांचा अतिवृष्टीमुळे शहराशी संपर्क दरवर्षी तूटत असतो त्याचा दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगाव लागत आहे.मच्छरांचा प्रादूर्भावामूळे रोंगांची लागण होत आहे.तसेच गंभीर आजार असलेले रूग्ण वेळेवर उपचार घेण्यासाठी शहरात पोहचू शकत नाही.गर्भवती स्त्री संकटकाळात जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोहचू शकत नाहीत. अश्या अनेक संकटांचा सामना जनतेला कराव लागत आहे.
सामान्य जनतेवर ओढणारे संकट जाणून त्यातून मार्ग म्हणून नविन रस्ता व पूलाची मागणी ना.सूधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आढावा बैठकीत माजी जि.प.सदस्य अमर बोड्लावार यांनी मांडून शासनाचे लक्ष वेधले.त्या अनुषंगाने नामदार सुधिर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना संबधित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश व सूचना केल्या