गोंडपिपरी(सुरज माडुरवार):- गोंडपिपरी तालुक्यात अनेक गावांना पुराणे वेढा घातला आहे तर काही गावात आरोग्य सुविधा नाही.अशा स्थितीत आर्वीतील यशस्वी रामचंद्र गेडाम,पूर्वा मत्ते,सानवी जेऊरकर,रियासी जेऊरकर यांची तब्बेत बिघडली.आर्वी हे गाव लाठी उप पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तिथल्या ठाणेदारांशी कुटुंबियांने संपर्क साधला परंतु लाठी गावसुद्धा पुराच्या वेढ्यात अडकले असल्यामुळे लाठी चे ठाणेदार मनोहर मोगरे यांनी कोठारी चे ठाणेदार तुषार चव्हाण यांना माहिती दिली. ठाणेदार चव्हाण यांनी आज पहाटे ५ वाजता सदर माहिती फोन द्वारे गोंडपिपरीचे तहसीलदार के डी मेश्राम यांना देत रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली .लागलीच तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चकोले यांचेशी संपर्क साधून कन्हाळगाव येथे जंगलात कॅम्प नंबर चार वर रुग्णवाहिका पाठवली.पोलीस कर्मचारी विनोद निखाडे, सचिन पोहनकर,प्रवीण कडुकर,साईनाथ उपरे,रानु पोरोते,डोंगरकर यांनी चारही जणांना उपचारासाठी चंद्रपूर ला रवाना केले.विशेष म्हणजे कोठारीचे ठाणेदार चव्हाण यांची आई मुंबई ला दवाखान्यात व्हेंटिलेटर वर असून ते स्वतः मुंबई ला आहेत. तरीसुद्धा तिथून सगळी परिस्थिती हाताळत रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूर पाठविण्याची व्यवस्था केली.