• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

राज्य शासनाची अतिवृष्टी भरपाई दिलासाजनक नाही : रवि शिंदे

दुबार अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवी आहे भरीव आर्थिक मदत

Ashish Ghume by Ashish Ghume
August 11, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा निवेदनाचा फार्स न करता थेट आंदोलन करू – रवी शिंदे
Spread the Information

एकरी पीककर्ज वाटप, शेती, घर व जनावरांचे नुकसान, शेतीपूरक व्यवसायाचे नुकसान, पूरपरिस्थिती नंतरचे आजार, रोगराई या सर्वांचा निर्णय घेतांना विचार करावा

राज्य शासनाची मदत तुटपुंजी व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी रवि शिंदे यांचा आरोप

वरोरा :राज्य शासनाने पूरग्रस्तांसाठी तीन हेक्टर पर्यंत हेक्टरी १३,६०० रुपये मदत देण्याचा घेतलेला निर्णय हा दिलासाजनक नाही, एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले आहे, राज्य शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दुबार अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरीव मदत होत नाही, असा आरोप स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी केला असून शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या हेक्टरी पीक कर्जाची सरसकट माफी, सानुग्रह अनुदान तथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान व चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने वेकोली प्रभावित क्षेत्रातील शेतीच्या नुकसानीची भरपाई वेकोलीच्या सीएसआर फंडातून करावी, आदी स्वरूपात मदत द्यावी, तरच शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने मदत होईल असे म्हटले आहे.
राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल (दि.१०) ला निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाने जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. त्याचबरोबर दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास पुरेसा नसून याने शेतकऱ्यांचे दुबार अतिवृष्टीमुळे झालेले अतोनात नुकसान भरुन निघू शकणार नाही, असे रवि शिंदे म्हणाले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रती एकरी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्यामध्ये धानपिका करीता एकरी १९,१०० रु., ज्वारीपिका करीता एकरी ११,२०० रु., कापूसपिका करीता एकरी २८,७०० रु., तूरपिका करीता एकरी १९,००० रु., सोयाबीन पिका करीता एकरी २१,१०० रु., ऊसपिका करीता एकरी ४६,४०० रु., भुईमुग पिका करीता एकरी ३१,००० रु., मकापिका करीता एकरी १३,८०० रु., मिरचीपिका करीता एकरी ४३,३०० रु., उडीदपिका करीता एकरी ११,९०० रु., मूंगपिका करीता एकरी ११,७०० रु. आदी प्रकारे पीक कर्ज वाटप झालेला आहे. त्या तुलनेत राज्य सरकारची मदत एकरी नसून हेक्टरी आहे व ती फारच अत्यल्प आहे, असेही रवि शिंदे म्हणाले.
रवि शिंदे यांनी वरोरा व भद्रावती तालुक्यात नुकतीच शेतकऱ्यांची व गावातील सहकारी संस्था तथा ग्रामपंचायत पदाधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत एप्रिल, मे, जुन मधे घेतलेले पीक कर्ज माफ होऊन नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, पीक कर्जाची सरसकट माफी द्यावी, सानुग्रह अनुदान द्यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. अनुदान द्यावे, वेकोली प्रभावित क्षेत्रातील शेतीच्या नुकसानीची भरपाई वेकोलीच्या सीएसआर फंडातून करावी आदी मागण्यांचा गावपातळीवर ठराव घेवून राज्य शासनाला गावा गावातून जिल्हाधिकारी मार्फत ठराव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ठराव घेवून जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला शेतकऱ्यांनी ठराव पाठविण्याची मोहीम सुरु आहे. त्यामुळे या निर्णयाचा राज्य शासनाने फेरविचार करावा. निर्णय घेतांना शेती, घर व जनावरांचे नुकसान, शेतीपूरक व्यवसायाचे नुकसान, पूरपरिस्थिती नंतरचे आजार, रोगराई या सर्वांचा विचार करावा. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं झालेलं पिकांचं, घरांचं, शेतजमीनींचं नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्यानं सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसने बंद करावे, व शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अन्यथा राज्य शासनाविरोधात सदर मागणीला घेवून उच्च न्यायालयाच्या खंडपिठात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असेही रवि शिंदे म्हणाले आहे.
यावेळी रवि शिंदे यांचेसह दत्ता बोरेकर, भास्कर ताजने, वसंता मानकर, धनराज आस्वले, बाळू भोयर, महादेव जीवतोडे, वासुदेव ठाकरे, रोहन कुटेमाटे, विश्वास कोगरे, प्रकाश शेळके, कन्हैयालाल जयस्वाल, रामदास डहाळकर, राहुल बलकी आदी उपस्थित होते.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही मदतीकरीता ट्रस्ट सोबत संपर्क साधावा

Next Post

परमानंद तिराणिक आदिवासी समाज कला भुषण पुरस्काराने सन्मानित

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
परमानंद तिराणिक आदिवासी समाज कला भुषण पुरस्काराने सन्मानित

परमानंद तिराणिक आदिवासी समाज कला भुषण पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1