गोंडपीपरी(सुरज माडुरवार) :- तालुक्यात रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. गावातील छोटे नाले,पूल तुडूंब भरून वाहत आहे.अशातच तालूका सभोवताल वाहणाऱ्या नद्या नाल्यांना पूर आला आहे.गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथील रवि आत्राम याचे काल (मंगळवारी) निधन झाले.अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीकडे जात असताना वाटेतील अमराई नाला पाण्याने भरून वाहत असल्याने गुडगा भर पाण्यातून प्रेत यात्रा खांद्यावर घेऊन पाण्यातून मार्ग काढत स्मशानभूमी गाठावी लागली. पाच हजार लोकसंख्येच्या करंजी गावात स्मशानभूमीचे काम करण्यात आले मात्र अल्पावधीतच तो मार्ग उखडला. त्यामुळे नाल्याला वेढा मारून मार्ग काढत स्मशानभूमी कडे जावे लागते.तात्काळ नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात यावे किंवा रपटा निर्माण करावा अशी मागनी नागरिकांकडून केल्या जात आहे