चंद्रपूर – गोंडपिपरी तालुक्यातील चेकबेरडी ग्रामपंचायत अंतर्गत मोठी बेरडी जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे शिष्ट मंडळ संवर्ग विकास अधिकारी यांना भेटून समस्या मार्गी लावण्याची विनंती केली. मौजा मोठी बेरर्डी येथील जिल्हा परिषद शाळा 1 ते 5 वर्ग असून 2 शिक्षक कार्यरत आहे. पण नुकतेच मडावी शिक्षिका यांना तात्पुरते स्थगनादेश दिल्याने सदर शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे सदर शिक्षक मुख्याध्यापक असल्याने पंचायत समितीमध्ये वारंवार शासकीय कामे मीटिंग संदर्भात जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होते व सदर शाळा ही जंगलाला लागून असल्याने वाघांचा धुमाकूळ आहे व शाळेला वॉल कंपाऊंड नसल्याने विद्यार्थी सैरावैरा होत असल्याची गंभीर बाब सवर्ग विकास अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी वरील बाबीची गंभीर दखल घेत सदर शिक्षकाला शाळा न सोडता विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना कडे लक्ष देऊन शाळेतच राहण्याच्या सूचना केल्या व शिक्षकांना कार्यालयीन कामकाजातून वगळून शाळेतच राहण्याचे सांगितले त्याप्रसंगी काँग्रेसच्या शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष तुकारामजी झाडे, नगराध्यक्ष सविता कुडमेथे ,तुकेश वानोडे ,काँग्रेस तालुका कर्याध्यक्ष निलेश संगमवार, महेंद्र कुंनघाडकर ,साईनाथ मडावी, सुरेश श्रीवासकर ,नगरसेवक पाणीपुरवठा सभापती सचिन चिंतावार ,बांधकाम सभापती सुरेश चिलंनकर इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते