चंद्रपूर :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अडेगाव येथे केंद्र भंगाराम तळोधीचे एकदिवसीय निपुण भारत मिशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.अल्का नागापुरे,अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती,उपाध्यक्ष शालिक झाडे,श्री प्रताप झाडे,संतोष आत्राम,शुभांगी गणेशकर,जिजाबाई तिवाडे इत्यादी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते त्याचसोबत केंद्र शाळेच्या बिट मुख्याध्यापिका सौ रेखा कारेकर मॅडम,छाया गोंडे,रवी कुळमेथे व केंद्रप्रमुख दुशांत निमकर यांनी प्रस्तावानेतून केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकेच्या सहकार्याने बालकांचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून उच्चश्रेणी मुख्याध्यापक तोषिनाथ झाडे,नानाजी मडावी,कानकाटे सर,तेलकापल्लीवार सर उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० येऊ घातलेला आहे त्यात पूर्व प्राथमिक ते इयत्ता ३ री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अवगत व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी ‘निपुण भारत अभियान’ सुरू केले आहे.यात एकूण पाच स्तर असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना निपुण भारत मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करण्याची भूमिका तज्ज्ञ मार्गदर्शक निलेश मडावी यांनी निपुण भारताची पार्श्वभूमी,गरज,महत्व शासन स्तरावरील प्रयत्न विशद करीत असतांना मत व्यक्त केले आहे.
केंद्रस्तरीय उद्बोधन वर्गाची सुरुवात प्रार्थनेने झाली असून निपुण भारत अभियान शैक्षणिक सत्र २०२६-२७ पर्यंत उद्देश साध्य करण्याचे आवाहन केंद्रप्रमुख दुशांत निमकर यांनी प्रस्तावनेत केले त्यानंतर निपुण भारताची स्वरूप,ध्येय,अध्ययन निष्पत्ती व शिक्षकांची भूमिका इत्यादी विषयावर मुख्याध्यापक मनोहर आंबोरकर यांनी तर FLN मिशन हेतू,भाषा आणि गणित विषय घटक यावर मंगेश पेंदाम विषय तज्ज्ञ यांनी तासीकेतून सांगितले.शाळापूर्व तयारी-शाळेतील पहिले पाऊल,विद्याप्रवेश व शिकू आनंदे मराठी गणित कृतीपुस्तिका,शिक्षक मार्गदर्शिका,इ-साहित्य व निपुण भारत अभियान अंमलबजावणी करिता अध्ययन-अध्यापन साहित्याचा वापर कसा करावा?या विषयी सविस्तर वृत्तांत राजेश्वर अम्मावार सर तर विनोद चांदेकर सर यांनी पालक व लोकसहभागातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे सुचविले आहे.
FLN मूल्यमापन हा एक नवीन शैक्षणिक धोरणामधील निपुण भारत अंतर्गत कार्यक्रम असल्याचे सूतोवाच व बालकांचा सर्वांगिण विकास साधावे असे प्रतिपादन अखेर दुशांत निमकर यांनी केले तसेच अखेर प्रतिज्ञा राजेश्वर अम्मावार यांनी शिक्षकांना देऊ केली तसेच या प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन अश्रका कुमरे मॅडम यांनी तर उद्बोधन वर्गाचा शेवट आभारप्रदर्शन शितल आकोजवार यांनी केले.निपुण भारत एकदिवसीय प्रशिक्षण पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोयर,राजेश लोणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना नाष्टा व चाय देऊन सांगता करण्यात आली.