अकोला– राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे मंगळवार दि. 8 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 10 वाजता मुर्तिजापूर येथून क्रीडा संकुल बार्शिटाकळी येथे बहुउद्देशिय इमारत लोकार्पण सोहळयाकरीता उपस्थिती. सकाळी साडेदहा वाजता बार्शिटाकळी येथून अकोलाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे बोलका वार्ड उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती व आढावा सभा. दुपारी 12 वाजता मोठी उमरी, अकोला येथे सिव्हेरेज ट्रीटमेंट प्लांट उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर नियोजन भवन, छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी परिसर, अकोला येथे विविध विषयावर आढावा बैठकीस उपस्थिती:
1) दुपारी एक वाजता दिव्यांगाना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसंदर्भात आढावा सभा.
2) दुपारी अडीच वाजता जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकास कणे संदर्भात आढावा सभा.
3) दुपारी तीन वाजता शिक्षण विभाग विविध विषयाबाबत आढावा- “वाकडेवाडी शाळा पॅटर्न” प्रत्येक तालुक्यामध्ये एक शाळा विकसित करणेबाबत व टिटवा पारधी तांडा शाळेबाबत आढावा सभा.
4) दुपारी साडेतीन वाजता आदिवासी विभाग आढावा-नाविन्यपुर्ण निधीबाबत व इतर तद्अनुषंगिक विषयाबाबत आढावा.
5) दुपारी चार वाजता क्रीडा विभाग- बि.ओ.पी. प्रस्ताव तयार करणे व जिल्हा क्रीडा समिती तयार करणे या विषयाबाबत आढावा.
6) दुपारी साडेचार वाजता आरोग्य विभाग- सुपर स्पेशलिटी हॉस्पीटल आढावा/सफाई कामगार/वार्ड बॉय यांचे विविध प्रश्न/ कोविड-19 आढावा व जिल्हा सामान्य रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय नविन ईमारत संदर्भात आढावा सभा.
7) सायंकाळी पाच वाजता खनिज निधी संदर्भात आढावा सभा.
8) दुपारी साडेपाच वाजता मनपा-मोर्णा नदी स्वच्छता/मनपा सफाई कर्मचारी व मनपा हद्दवाडीमध्ये समाविष्ट, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विविध प्रश्नांसदर्भात आढावा सभा व सवडीने दर्यापुर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.