या समस्येवर विशेष कायदा राज्य शासनाने करावा यावर अजित पवार यांचे चंद्रपूर दौऱ्यावर असताना भाष्य
भद्रावती :वरोरा-भद्रावती तालुक्यातील पूरपरिस्थिती ही वेकोलीची देण आहे, असा आरोप करुन येथील पुरबाधित हजारो शेतकऱ्यानी उचललेल्या पीक कर्जाचा परतावा वेकोलीने करावा व वेकोली प्रशासनाने सीएसआर फंडातून पूरग्रस्त गावांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी सर्वप्रथम स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी शिंदे तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर यांनी केलेली होती.
काल (दि.२८) ला राज्यातील विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहण्याकरीता जिल्हा दौऱ्यावर असताना सदर प्रश्न अधोरेखित झाला व कोळसा खाणींच्या मातीमुळे नदी प्रवाह बाधित झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे सत्य ऐरणीवर आले. ही वास्तविकता व त्यातील विदारकता सर्वप्रथम वेकोली प्रशासन व जिल्हा प्रशासनासमोर रवि शिंदे व प्रवीण सुर यांनी मांडली होती. यावर आता खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केल्याने वेकोलीच्या चुकीच्या नियोजनामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे सर्वश्रुत झाले आहे.
वेकोलिच्या ओव्हर बर्डनमूळे पुराचे पाणी अनेक गावांत शिरले. ही वास्तविकता वेकोली मान्य करत नाही. आम्ही आमच्या जागेवर मातीचे ढिगारे टाकले असे वेकोली प्रशासन म्हणतात. मात्र ही बाब पवार यांचे निदर्शनास आल्यावर, ते म्हणाले की यासाठी आता विशेष कायदा करण्याची गरज आहे. राज्य शासनाने ते केले पाहिजे. स्थानिकांनी यासाठी आवाज उचलावा. शासन यासाठी पुढाकार घेत असेल तर, आम्ही शासनाचे समर्थन करू.
यावर रवि शिंदे यांनी म्हटले आहे की राज्य शासनाने याबाबत शक्य तितक्या लवकर कायदा करुन कडक भूमिका घ्यावी. व सध्या झालेल्या नुकसानाची भरपाई वेकोली प्रशासणास करण्यास बाद्य करावे. अन्यथा स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन उभे करु.