चिमूर (चंद्रपूर )येथून जवळ असलेल्या बोथली गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या अडेगाव( कोहळी )येथे दि 6 व 7 फेब्रुवारी ला महानतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 वा पुण्यतिथी महोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला
गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवाशीय अडेगाव (को) यांनी वंदनीय तुकडोजी महाराज यांची 53 वि पुण्यतिथी आयोजित केली होती दि 6 जाने ला ग्रामसफाई करून सामुदायिक ध्यान व प्रार्थना करून रामधून काढण्यात येऊन रामधून वर हभप शंकर सोनवाने यांनी मार्गदर्शन केले यानंतर घटस्थापना हभप महादेव मगरे महाराज यांच्या हस्ते केली यावेळीं हभप गोविंदा मेश्राम हिरामण गेडाम माणिक सहारे नारायण सामुसाकडे बाबुराव आळे विश्वनाथ झोडे उपस्थित होते यानंतर समाज प्रबोधन भजन गुरुदेव वारकरी भजन मंडळ अडेगाव मंजुळा माता भजन मंडळ बोथली श्रीराम भजन मंडळ सिरपूर यांनी भजन सादर केले लगेच 4.58 ला महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आणि पार्थानेवर दामोदर बोरकर रत्नमाला सोनूने राईबाई मेश्राम यांनी मार्गदर्शन केले रात्रोला भजन संध्या आयोजित केली यात मंजुळा माता भजन मंडळ बोथली खुंटाळा गुरुमाऊली भजन मंडळ हरणी काजळसर भगवती भजन मंडळ काजळसर गुरुदेव वारकरी भजन मंडळ हरणी अडेगाव गोरवठ बेलदेव भजन मंडळ नवतला गुरुदेव भजन मंडळ सिरपूर तसेच इतर अनेक भजन मंडळांनी भाग घेतला
सकाळी ग्रामसफाई करून समुदायिक ध्यान हभप एकनाथ बोरकर हभप रामदासजी सोयम यांनी मार्गदर्शन केले यानंतर गावातून वंदनीय महाराजांच्या पालखी मिरवणूक व कलश यात्रा काढण्यात आली वाजत गाजत महाराजांचा जयघोष करीत टाळ मृदनगाच्या निनादात संपूर्ण भजन मंडळाच्या उपस्थितीत काढण्यात आली लगेच रामधून पर मार्गदर्शन एकनाथ बोरकर यानी केले यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला रत्नमाला सोनुने राजू जंगीटवार मनोहर चौधरी सरपंच रामु झोडे उपसरपंच कैलास झोडे बाबूराव आळे तुकाराम भाकरे विनायक झोडे बालाजी झोडे भाऊराव कुंभरे गुलाब आळे अरविंद कोसे सौ अस्मिता बन्सोड पोलिकराम झोडे सुधाकर नाकडे अशोक भाकरे जगदिश झोडे शरद झोडे ताराचंद बोरकर प्रेमानंद बन्सोड गिरीधर भाकरे सुभाष मसराम शेखर हांडेकर शुभांगी झोडे दीपक झोडे आदी उपस्थित होते यानंतर लगेच गोपाळ काला हभप महादेव मगरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता झाली या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ अडेगाव यांनी अथक परिश्रम घेतले.