वरोरा:- तालुक्यातील कोसरसार, सुसा,महालगावं या रोडवरील कोसरसार गावा नजीक असलेला पूल सतत चालू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात पुलाचा मलमा वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या मोठ्या वाहनाकरिता वाहतूक बंद असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
गेल्या काही दिवसांपासून जिह्यात तसेच तालुक्यात सततधार पावसाने अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या पुरामुळे कोसरसार , महालगाव मार्गावरील नाल्यावर असणाऱ्या पुलाचा मलबा पुरात वाहून गेल्याने जड तथा मोठ्या वाहनांची वाहतूक बंद आहे. पुलाची दुरुस्ती तथा उंची वाढवून देण्याबाबत . नागरिकांनी प्रशासनाला विंनती केली होती . पण प्रशासनाने या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने या पावसात हि परिस्थिती उद्भवली असून . लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून नवीन उंच पूल बांधावा अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन करावे लागेल असा इशारा कोसरसार ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा प्रहार सेवक अमित बहादुरे यांनी प्रशासनाला दिला आहे .