चिमूर :- खोड्या केल्या म्हणून वडिलांनी खोडकर मुलाला घर बाहेर काढले . वडिलांनी घराबाहेर काढल्याचा राग मनात ठेवून . एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने शांती वॉर्ड येथील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील रकमेवर कुलूप तोडून डाव मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
चोरी झाल्याची माहिती दर्ग्यातील नागरिकांना होताच त्यांनी 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली आणि दि 22 जुलैला संशय येताच पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चोरी करणाऱ्या संशयित सतरा वर्षीय मुलाला अटक करताच त्याने चोरी केल्याचे कुबल करीत 20 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले.
सविस्तर वृत्त असे की नेरी येथील शांती वार्डात हबिबखा उस्ताद दर्गा असून या दर्ग्यावर नेहमीच भक्त भाविकांची पूजा अर्चा करण्यासाठी ये जा असते आणि दर्ग्यातील दान पेटीत भाविक दान करीत असतात. नेहमी प्रमाणे सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपूर्वी दर्ग्यातील दानपेटी फोडल्याचे निदर्शनात येताच दर्गा कमेटी ने पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद दिली. त्यानंतर 2 दिवसांनी त्याच परिसरात राहणार एक अल्पवयीन मुलगा हा कुठल्याही प्रकारचे काम करीत नसून यांच्याकडे मौज करण्यासाठी कुठून पैसे आले असा संशय दर्ग्या कमिटीच्या लोकांना येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ नेरी येथे येऊन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि चोरी बदल विचारले असता त्याची हकीकत ऐकून सर्वच दंग झाले सदर अल्पवयीन मुलाला वडिलांनी घराबाहेर काढले म्हणून खाण्या पिण्यासाठी मौज करण्यासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याचे कबूल केले सदर चोरीतील पैसाने 15 हजार रुपयांचा मोबाईल घेतला आणि 5 हजार बिअर बार मध्ये उडविले असे सांगितले सदर अल्पवयीन मुलाला अनेक व्यसन असल्याचे बोलल्या जात असून पोलिसांनी त्याला अटक केले पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.