बल्लारपूर :– शहरात टेकडी विभागातील मुख्य रस्ता सीताबाई चौक ते ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाकरिता 4 कोटी इतका भरघोस निधी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे .या मुख्य रस्त्याची खुप दयनीय परिस्थिती झाली होती, रहदारीसाठी नागरिकांना खुप अडचणीचा सामना करावा लागत होता.या परिसरातील असंख्य नागरिकांकडून सतत हा रस्ता बनविण्याची मागणी होत होती. सत्ता परिवर्तन होताच विकासाच्या झंजावाताला सुरुवात करित .आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहराच्या विकासाला गती देत 4कोटी रु इतका भरघोस निधी मंजूर केला.या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने
बल्लारपूर शहरानजिक देशातील 29 वी सैनिकी शाळा, अत्याधुनिक व सुसज्ज असे स्टेडियम , देशातील अत्याधुनिक असे बोटॅनिकल गार्डन , देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक, उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्मार्ट पोलिस स्टेशन, छटपूजा घाट, मुख्य मार्गांचे सिमेंटीकरण,आकर्षक विद्युत दिवे , डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्याधुनिक भाजी मार्केटचे बांधकाम, ई-वाचनालय, बालोद्यानाची निर्मीती, नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम , मुलींसाठी डिजिटल शाळा अशी विविध विकासकामे पूर्णत्वास आली आहे .
.या निर्णयाचे वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष काशी नाथ सिंह, शहर महामंत्री .मनीष पांडे, भाजपा जेष्ठ नेते .शिवचंद द्विवेदी, .रेणुका दुधे,निलेश खरबडे,समिर केने,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,भाजपा विधी प्रकोष्ट जिल्हा संयोजक अॅड.रणन्जय सिंह,भाजपा महीला आघाडी अध्यक्ष .वैशाली जोशी,माजी नगरसेवक मिना चौधरी,येलय्या दासरफ, गणेश बहुरीया,जयश्री मोहुर्ले,सुवर्णा भटारकर, सारिका कनकम,पुनम मोडक,अरुण वाघमारे.राकेश यादव, स्वामी रायबरम,.महेंद्र ढोके,.साखरा नबी अहमद,.आशा संगीडवार तसेच .राजेश दासरवार,.देवेंद्र वाटकर,.सतीश कनकम,.किशोर मोहुर्ले, .अरविंद दुबे,.मोहीत डंगोरे,आनंद डंगोरे,देवराव निंदेकर,उमेश गजपुरे,,तानाबाई मेश्राम,राजकुमार श्रीवास्तव,दिनेश कोकूलवार,प्रविन मोडक,सुधीर लिडबे,वनीता चक्रवर्तीवार आदींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.