चिमुर :- तालुक्यात झालेल्या सततधार पावसामुळे व 18 जुलैला आलेल्या भीषण महापुरामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावीत होऊन विस्कळित झाले सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते याचा सर्वात मोटा फटका मानव जनावरे घरे यांच्या सहित पिकांना बसला असून तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पिके पुरांमुळे उदवस्त झाली सदर पुरग्रसत्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 19 जुलैला चिमूर येथे आले असता तात्काळ पिकांची प्रशासन तर्फे दखल घेऊन पांचनामा करण्यात येईल असे निर्देश देताच आज दि 21 जुलैला मोटेगाव येथील पूरग्रस्त भागाची पाहणी चिमूर तालुका कृषी विभागानी करून पंचनामा ला सुरवात केली आहे
मोटेगाव येथील गोधनी नदीला भयंकर असा महापूर आला यात संपूर्ण शेत जमीन पाण्याखाली आली असून संपुर्ण पीक नष्ट झाले त्यात धानाचे रोपे रोहणे तसेच तुरी परहाटी सोयाबीन वाहून गेले तर काही सडले असून चिवारून नष्ट झाले सदर नुकसानीची दखल शासनाने घेऊन कृषी विभाग चिमूर च्या वतीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून। पंचनामा करण्यात आला यावेळी तालुका कृषी अधिकारी डी ए तिके, मंडळ कृषी अधिकारी आर के निखारे, तांत्रिक कृषी अधिकारी विलास शेंडे ,कृषी सहायक अमित रंदये ,तलाठी कामडे ,ग्रामसेविका वाघमारे , सरपंच सुभाष नेवारे मोटेगाव ,उपसरपंच चंद रामटेके आणि शेतकरी वर्ग नागरिक उपस्थित होते