गोंडपिपरी-लिखितवाडा-वढोली मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असून शेतकऱ्यांना,प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून डायवरशन रपट्याचे काम करणे कंत्राटदाराला अनिवार्य असते.तशी निधी देखील मिळते वढोली अंधारी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लिखितवाडा नाल्याला आठवड्या भरापूर्वी पूर आला होता. बनवलेला रपटा वाहून गेल्याने .शंभर शेतकऱ्यांची शेती संकटात आली असून एक किलोमीटर चे शेत गाठायचे असल्यास १० किलोमीटर बोरगाव,वडकुली मार्गे प्रवास करून शेत गाठावे लागत असल्याने वढोली येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.काहींनी तर गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या शेतात पाय देखील ठेवला नाही ज्यांच्याकडे मोटार-गाडी उपलब्ध नाही शेतकऱ्यांना दहा किलोमीटर पायदळ प्रवास करून आपलं शेत गाठावे लागत आहे. लिखितवाडा – वढोली मार्ग बंद असल्याने अनेकांची शेती उध्वस्त झाली आहे.बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ रपटा बनवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोनलाचा इशारा गावकऱ्यांनी दिला लक्ष वेधण्यासाठी पुलावर शेतकऱ्यांनी निदर्शने केली.यावेळी ग्रा.पं सदस्य संदीप पौरकार,संजय माडुरवार,वनसमिती अध्यक्ष संदीप लाटकर,माजी पं स सदस्य विनोद देशमुख,वैभव पिंपळशेंडे, सुरज माडुरवार,साईनाथ भोयर, उद्धव खराबनकर, अनिल खराबनकर, रणजित लांबाडे यादव भोयर, भगीरथ लांबाडे संतोष खरबनकर यांची उपस्थिती होती