300 छोटी मुले व महिलांना माढेली येथील मुथा भवन मध्ये आश्रय
वरोरा :- सततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली.पुरपरिस्थितीमुळे प्रशासनाने अलर्ट केला की गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.आणि प्रशासनाने घटनास्थळी जाऊन नागरिकांना गावातून बाहेर काढण्यासाठी बोटी सारख्या यंत्रणांचा वापर करून तालुक्यातील सोईट,तुलाना, शेंबड् ,करंजी ,बामरडा आदि गावातील नागरिकांना सुरक्षतेच्या ठिकाणी हलविले.मात्र काही तासातच पाण्याची पातळी कमी झाल्याने काही गावांचे नागरिक आपापल्या गावी परंतु लागल्याचे वृत्त आहे.
तालुक्यातील सोईट या गावाला लागून वर्धा नदी असून वणा व वर्धा नदीचा संगम याठिकाणी आहे.या गावाला 1933,1979,1994 दरम्यान महापूरानी
थैमान घातले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार हे 1979 ला मुख्यमंत्री असतांना सोईट या गावाला आले होते त्यावेळेस त्यांनी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी हिरवी झेंडी दिली.आणि गावाचे पुनर्वसन झाले.परंतु काही कुटुंब गेले आणि बरेच कुटुंब जैसे थे राहिले.त्यानंतर 1994 पासून महापूर झाला नाही .परंतु यावर्षाला सततधार पावसामुळे गावाला महापुराची परिस्थिती निर्माण झाली.आणि होत्याचे नव्हते झाले.नदीला व नाल्याला लागलेल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनी बुडाल्या व पिके तर नष्ट झालीत परंतु पाण्याने गावाला वेढा करून वित्तहानी झाल्याचे कळते. हजारो हेक्टर जमीन पुराचे पाण्याखाली आल्यानेशेतकरी पूर्णतः हवालदिल झाला.
तालुका प्रशासनाने सोईट,बामरडा, दिंदोडा येथे जाऊन पूरपरिस्थिती ची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुद्धा तहसीलदार तहसीलदार रोशन मकवाने यांनी सुरू केल्याचे कळते.सोईटचे सुपुत्र मुंबई बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ.विजय देवतळे यांनी सोईट गावाला भेट देऊन पुरपरिस्थितीची पाहणी करून गाव नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केले.
सोईट येथील नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाने बोटीद्वारे जवळपास 300 छोटी मुले व महिलांना गावाचे बाहेर काढून माढेली येथे आणण्यात आले आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक व जी.प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाशचंद मुथा यांनी पीडित नागरिकांना आश्रय देण्यासाठी आपले मंगलकार्यालय मोकळे करून दिले व त्यांची व्यवस्था केली.
परंतु पाण्याची पातळी खाली आल्याने नागरिक आपल्या स्वगृही परतत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.