अहेरीत सामाजिक संस्थांना केले आर्थिक मदत
अहेरी:-मागील पंधरवाड्यापासून अतिवृष्टीमुळे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांच्या मदतीकरिता बुधवार 20 जुलै रोजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बारामती ऍग्रो कंपनी व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात दाखल झाले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत पुरपीडितांच्या भेटीकरिता अहेरी येथून सिरोंचाकडे रवाना झाले आहेत.
तत्पूर्वी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरीतील राजवाड्यात सामाजिक कार्यात सहभागी असणारे हेलपिंग हॅन्डस बहुद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी, एकता बहुद्देशीय क्रीडा व कला मंडळ अहेरी , आणि शिवकल्याण युथ मल्टिपर्पज डेव्हलपमेंट फाऊंडेशन, गडचिरोली यांच्याकडे पुरपीडित व गरजूंच्या मदतीकरिता आर्थिक मदतही सुपूर्द केले.
आपली माणसं अडचणीत असताना शक्य ती मदत करण्याची महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे त्याअनुषंगाने राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अन्नधान्य, औषधे, कपडे आदी जीवनावश्यक वस्तू व साहित्य पोहचविण्यासाठी आणि थेट पूरग्रस्त भागातील नागरिक व पुरपीडितांच्या भेटीसाठी आमदार रोहित दादा पवार अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात पोहचले असून तीन दिवसीय मुक्कामात पुरक्षेत्रातील भागाचा दौरा करून पुरपीडितांची भेट घेऊन दिलासा देणार आहेत.
दौऱ्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम सोबत असणार असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व अन्य पदाधिकारी सोबत आहेत.