वरोराः-संततधार पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने त्वरीत पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलाावे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातुन केेलेली आहे.
चंद्रपूर जिल्हयात मागील दहा दिवसापासून संततधार पाऊसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहे. अनेक गावांत पुर आल्याने शेतकरी बांधवांचे शेतपिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
नदी काठवरील गावांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली आलेली आहे. तसेच शेेतातील पिक त्यात सोयाबीन, कापूस, तुरी व इतर पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्यात असून त्यात पुराने शेतातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.
प्रशासनाने पुरग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना शेतातील पिकाचे नुकसान पाहता त्वरीत पंचनामे करून आर्थिक सहाय देण्याची मागणी यावेळी डॉ. आगलावे यांनी निवेदनातुन केलेली आहे.