राजुरा:- राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने जमीनदोस्त झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.त्यामुळे सरकारने शेतीचे पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी केली आहे.
उपविभागात मागील एक आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे नदीला पूर आला आहे. शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतातील उभे पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे.त्यांच्यासमोर जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरीत शेतीचे पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.