गोंडपिपरी(सूरज माडुरवार):- वढोली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील सात दिवसांपासून बंद आहे.परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या पाच गावांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची झळ बसत आहे.काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने गढूळ पाण्याने नागरिकांना तहान भागवण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे.
ही योजना मोरे ठेकेदारांमार्फत चालवल्या जाते या योजनेअंतर्गत वढोली,तारडा, फुर्डी हेटी,खरारपेठ,बोरगाव,चेकबोरगाव या पाच गावांचा समावेश आहे.वर्ष भरात ही योजना ठेकेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तीन ते चार महिने बंद असते.तात्काळ पाणी पुरवठा सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्राम पंचायत सदस्य संदीप पौरकार,नलिनी कोहपरे,सुरेंद्र मडपल्लीवार,सुवर्णा पोलोजवार या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.एन पावसाळ्यात पाणीटंचाईची झळ बसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे