चिमूर :- तालुक्यातील खांबाडा गोंदेडा मार्गावर शेती च्या कामासाठी केवाडा येथील मजुरांना घेऊन जाणाऱ्या पीक अप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला पलटले यात चार जणांना गंभीर दुखापत झाली असून १६ जन किळकोळ जखमी झाल्याची घटना 11 जुलै ला सकाळच्या सुमारास 9 वाजता दरम्यान घडली.
सध्या शेतीच्या हंगामाला सुरवात झाली असून मजूर वर्गाची कमतरता भासत असल्याने वाहनाने मजुरांची ने आन करून शेतीचे कामे पूर्ण केल्या जात आहे. हा प्रकार तालुक्यातील सर्वच गावामध्ये सुरू असून मजुरांची वाहतूक सुरू आहे. केवाडा येथील 40 ते 50 मजुरांना पीक अप मध्ये घेऊन चिमूर जवळील येरखेडा येथील शेतात कामाला नेत असताना खांबाडा गावाच्या जवळच पीक अप एम एच ३४ ए वि १२०८ या क्रमांकाचा पीकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले .या अपघातात १५ ते २० मजूर किरकोळ जखमी तर चार मजूर गंभीर जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही सदर घटनेत जखमी मजुर व वाहन जागेवर सोडून वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.सदर अपघाताचा आवाज येताच बाजूला शेतात काम करणाऱ्या शेतकरी, मजूर व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत जखमीना पिकअप बाहेर काढले तसेच रुग्णवाहिका बोलावून गाडीतील सर्व जखमी मजुरांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी पाठविले.सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले चौकशी करून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.