मुलचेरा:- जवाहर नवोदय विद्यालयच्या इयत्ता 6 वीत प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र 2021-22 या वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलचेरातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
संपूर्ण भारतात 30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा घेण्यात आली होती.राजे धर्मराव हायस्कुल,मुलचेरा येथील केंद्रात विध्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी 263 विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते. त्यापैकी 248 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.नुकतेच निकाल जाहीर झाला असून त्यात केवळ 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.त्यात खाजगी शाळेतील दोन मुली तर जिल्हा परिषद शाळेतील एक मुलगी तर दोन मुलांचा समावेश आहे.या सर्व विध्यार्थी 2022-23 या नूतन शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावीत जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे प्रवेश घेणार आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.काव्या महेश गुंडेटीवार हैदराबाद इंटरनॅशनल स्कुल,मुलचेरा,कु.औक्षणी पराग दुर्योधन ग्रीनलिफ पब्लिक स्कुल मुलचेरा,सुमित सुरेश दब्बा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मल्लेरा,कु.मनस्वी शामु आत्राम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लगाम,अधर्व अनिल मेकलवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहूर्ली या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी एम बी कडते,केंद्र निरीक्षक व साधन व्यक्ती चांगदेव सोरते तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.