चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी (एफ.इ.एस) द्वारा संचालित एफ.इ.एस.गर्ल्स कॉलेजची इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी कु. श्रुती देवानंद मारबते हिला 2021-2022 या सत्रात झालेल्या परीक्षेत संगीत विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले आहेत.नागपूर बोर्डातून श्रुती प्रथम आली असून सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.श्रुतीच्या या नेत्रदीपक यशामुळे एफ.इ.एस.कॉलेजची मान उंचावली आहे,अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष ऍड.विजय मोगरे, सचिव ऍड.सातपुते,शाळा समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी दिली आहे. संस्थेचे विश्वस्त शेंडे ,श्रीमती पोटदुखे यांनी कौतुक केले असून श्रुतीने या यशाचे श्रेय प्राचार्य सौ. बुटले, उपप्राचार्य बेले व संगीत शिक्षिका क्युरेशी यांना दिले आहे.
संगीतात करियर करण्याचा संकल्प
मला संगीत खूप आवडते.गायनाची देणं असतांना आई व बाबांनी खूप प्रोत्साहित केले.माझ्यासाठी त्यांनी विसापूर सोडले.खरे श्रेय त्यांचेच आहे.संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा माझा संकल्प आहे.
श्रुती देवानंद मारबते
एफ इ एस कॉलेज.