मुंबई :- राज्यातील राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट बघायला मिळत आहे .त्यात आज विधानसभा अध्यक्ष पदाकरीता महविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्या धर्तीवर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना बंडखोर आमदारांना इशारा देत उद्या होणाऱ्या निवडणुकीत बंडखोर आमदारांनी पक्षादेशानुसार मतदान न केल्यास बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे .
बघा काय म्हणाले शिवसेना नेते आमदार राजन साळवे
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. शिवसेनेच्या पक्षादेशानुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाने काढलेला पक्षादेश
महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेच्या पक्षादेशानुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे राजन साळवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले .
हे हि वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी