मुंबई :- राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेते पदावरून काढण्यात आल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कालच(३०जूनला) शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असे वक्तव्य केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. .
हे ही वाचा
video शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे