चिमूर :- तालुक्यातील मांगलगाव येथे कृषी संजिवनी सप्ताह मोहिमेअंतर्गत राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस उत्पादकता वाढ व मुल्य संवर्धन विकास योजना प्रशिक्षण कार्यक्रम सभा दि २८ जुन ला आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत शेतकरी उपस्थित होते.
या सभेला तालुक्यातील कृषी अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी मान्यवर म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात कृषी विषयक तसेच कापूस उत्पादकता व मूल्य संवर्धन या वर मान्यवरांनी मार्गदर्शन केले यात हेमत शेदरे कृषी भुषण शेतकरी सावरगाव यांनी कापुस पिकाची एकात्मीक पिक व उत्पादकता वाढ विषयी व लागवड विष लागवड पध्दतीत बदल करणे हे काळाची गजर असुन बि.बि.एफ. व सरी वरंभा पध्दतीने लागवड करण्याचे सागण्यात आले.तसेच रमेश तिडके प्रगतशील शेतकरी यांनी मागदर्शन करतांना भाजीपाला लागवड व तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले. रामचंद्र ठाकरे प्रगतशील शेतकरी यांनी मागदर्शन करतांना मिरची पिका वरील संगोपन व खर्चाचा ताळमेळ बदल माहीती दिली. तालुका कृषी अधिकारी डि.ए. तिखे यांच्या मार्गदशनात यंदाचा खरिप हंगाम यशवी व्हावा या वतिने कृषी विभागातील विविध योजना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बाधवांना दिली.मंडळ कृषी अधिकारी आर. के. निखार यांनी मार्गदर्शन करताना कृषी विभागातील विविध योजना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी महिलानां दिली. कृषी पर्यवेक्षक व्हि. के. शेन्डे यांनी मार्गदर्शन करताना धान पिक लागवड करतांना श्रीपध्दतीने व पटा पध्दतीचे महत्व सांगीतले. कृषी सहाय्यक बि.बि.आडे यांनी मार्गदर्शन करताना शेती तंत्रज्ञानाची माहिती कापुस, सोयाबिन, भातपिक लागवड़ी संदर्भात मार्गदर्शन, बिज प्रकिया, बुरशीनाशके, किटकनाशके, जैविक बिज प्रकिया, निबोळी अर्क वापर, आझोला युनिट, व इतर कृषी विभागाचा योजनेची माहीती दिली. या कार्यक्रमाला मांगलगाव व परिसरातील अनेक शेतकरी वर्ग उपस्थित होते