– ब्रिटिश सरकारची ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहिर
चंद्रपूर : विधायक कामाचा वसा घेतलेल्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड.दीपक यादवराव हेमलता चटप हा तरुण वकील. ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणा-या ‘चेव्हेनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे. अवघ्या २४ व्या वर्षी शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो यावर्षीचा पहिला तरुण वकील असेल. लंडनच्या मधील जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली असून दीपकच्या शिक्षणावर ब्रिटिश सरकार ४५ लाखांहून अधिक रक्कम खर्च करणार आहे. नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारची ही शिष्यवृत्ती उभारी देणारी ठरते आहे. विधायक कामातून दीपक ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे.
मूळचा आदिवासीबहुल दुर्गम अशा लखमापूर (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. शेतकरी चळवळीच्या विचारांचा वसा व वारसा असलेल्या दीपक हा सामाजिक जाणिवेतून दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप, पद्मश्री डॉ.अभय बंग, विधिज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले काम दखलपात्र ठरले.
दीपक हा कुटुंबातील विदेशात उच्च शिक्षण घेणारा पहिला तरुण! प्राथमिक पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण गडचांदुर येथे पूर्ण केले. पुढे विद्येचे माहेरघर पुणे येथील नामांकित आयएलएस विधि महाविद्यालयातून कायद्याची पदविका प्रथम श्रेणीत मिळवली. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या. विधीमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न करणारा हा शेतकऱ्याचा पोरगा! मात्र, परदेशात शिक्षणासाठी लागणारा खर्च हा अवाक्याबाहेर होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्सला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम यानी दीपकला प्रेरणा दिली. लंडन विद्यापिठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ.जयदीप चटप, काका भास्कर चटप, राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले, राधा मोहितकर आदींनी साथ दिली. त्याची जिद्द आणि चिकाटी त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. दीपकने परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा पाहिलेले स्वप्न ब्रिटिश सरकारच्या या स्कॉलरशिपमुळे आता पूर्ण होणार आहे.
या कामामुळे झाली जागतिक दखल
• दीपक हा उत्तम लेखक असून २ पुस्तके प्रकाशित
• गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल
• संविधानिक नैतिकता हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
• कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास १३०० कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण तर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून नवसंजिवनी दिली.
• कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी २०१८ ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्वाची भूमिका.
• कोरो इंडिया फेलोशिपच्या माध्यमातून तळागळात मूलभूत संविधानिक हक्कांवर काम
Karanji (Chandrapur): Despite the Individual Forest Rights claims being pending, Forest Department sent notice to 80 tribals and other forest dwellers to vacate the land. We conducted session in the village to provide legal help to tribals and farmers for ensuring their rights. pic.twitter.com/HwCAbcCJ51
— Deepak Chatap (@deepak_chatap) March 12, 2022
भारतात येणारा काळ शेतकरीपुत्रांचा व दुर्बल घटकांचा
शेतकरी चळवळीने अन्यायाविरूद्ध बंड करायला शिकविले. लखमापुर ते लंडन हा आपला शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील शेतकरी व दुर्बल घटकांतील पुत्रांना ऊर्जा देणारा ठरेल. जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरू झालेलं आपलं शिक्षण लंडनच्या विद्यापीठापर्यंत मजल गाठता येणे हे आई – वडिल, भाऊ, काका व मित्रांनी दिलेली खंबीर साथ यामुळेच पूर्णत्वाकडे वाटचाल करणारे आहे. येणाऱ्या काळात शेतकरी व समाजातील दुर्बल घटकांतील तरुणांना उच्च शिक्षण घेत आपल्या समाजासाठी झटावे लागणार आहे. ब्रिटिश सरकारने दाखविलेला विश्वास मोलाचा असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम उभे करेल. भारतात येणारा काळ हा आमचा असेल.
https://www.facebook.com/100002661896272/posts/pfbid0L9RQdJiqtrkXTmU29Q68vS227SzijFrXeNS9ZU7ERWQbrNBqwPDhc7GCy9j98Mnzl/
https://www.facebook.com/100002661896272/posts/pfbid0L9RQdJiqtrkXTmU29Q68vS227SzijFrXeNS9ZU7ERWQbrNBqwPDhc7GCy9j98Mnzl/