मुंबई :- द्यायचं असेल तर नव्या मंत्रिमंडळात जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद द्या अशी मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केल्याची माहिती सध्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण विभागासह बऱ्याच विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. नवीन मंत्री मंडळातही राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश होणार असल्याच्या पोष्ट सोशल मीडियावर वायरल होत आहे . कॅबिनेट मंत्रीपदांवरून बच्चू कडू नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी व मा. देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा…! pic.twitter.com/qWtseVYjcI
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) June 30, 2022
बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते पहिल्यांदाच राज्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवशी सुरतला जाणाऱ्या आमदारांमध्ये बच्चू कडू यांचा समावेश होता.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत आजही ते गोव्यात आहेत. आपल्याला ग्रामीण विभागाशी निगडीत विभाग मिळावा तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
येत्या आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपा, अपक्ष, शिंदे गट व इतर छोट्या पक्षांचे अनेक आमदार मंत्रीमंडळात समावेश होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रत्येक आमदार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे.मात्र, सर्व मिळून ४३ मंत्रीपदे आहेत.त्यापेक्षा जास्त मंत्री करता येत नाहीत.त्यामुळे शिंदे गट, अपक्ष व छोट्या पक्षांच्या अपेक्षा पाहता अनेकांच्या अपेक्षा भंग होणार असल्याचे चित्र बघायला मिळेल . पण या सर्व सत्तासंघर्षात सुरवाती पासून आपली युती फक्त जनतेशी आहे असे नेहमी म्हणणारे बच्चू कडू यांच्या पदरी कॅबिनेट मंत्री पद येते कि राज्यमंत्री हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे .