वरोरा :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समितीद्वारा स्थापित आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी परसोडा येथे कृषी संजवनी मोहिमेअंतर्गत कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कवडू गारघाटे ,कार्यक्रमाचे उदघाटन रमेश पावडे उपसरपंच ग्रा. प. परसोडा व प्रमुख पाहुणे म्हणून शुभम आमने अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ, परसोडा वैशाली कुरेकर ,पोलीस पाटील सुनील कुरेकर सदस्य ग्रा.प. परसोडा वाघुजी मडावी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच पुंडलिक कळसकर इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या फोटो ला माल्यार्पण करून करण्यात आली.हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार , कार्यक्रम समन्यक डॉ. स्वप्नील पांचभाई ,ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ. रामचंद्र महाजन , डॉ.प्रदीप अकोटर , डॉ. सतीश इमडे , डॉ. मुकुंद पातोंड यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्क्रमाअंतर्गत कृषी विद्यार्थीनींनी तर्फे कृषी संजवनी मोहिम राबविण्यात आली. याअंतर्गत प्रतिष्ठा खाडे हिने कृषी दिनाचे महत्त्व ,ऋतुजा गिरी हिने मूल्यसाखळी बळकटीकरण, प्राजक्ता हटीटेल हिने विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, वैष्णवी हनवते हिने पौष्टिक तृनधान्य,काजल कपगाते हिने महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण,पूजा कड हिने खतांचा संतुलित वापर,श्रुतिका खेकडे हिने शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली.कवडू गारघाटे आणि पुंडलिक कळसकर यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून संवाद ठेवण्यात आला.तसेच कृषी विद्यार्थिनींनतर्फे स्व. वसंतराव नाईक यांची प्रतिमा परसोडा ग्रामपंचायत ला भेट म्हणून देण्यात आली.