मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले ‘काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत.
मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहायांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचामुख्यमंत्री झाला असता.
मात्र, त्यावेळी भाजपने का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पाठित वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असं ते म्हणत आहेत. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी बंडखोरांना आणि मुख्यमंत्र्यांना सुनावलं.