तो ठराव रद्द करा – सर्व धर्मीय युवकांनी दिले मुख्याधीकाऱ्यांना निवेदन
कोरपणा :- शहरातील कचरा व घाण कचरा विल्हेवाट लावण्यासाठी तहसीलच्या बाजूने कचरा व्यवस्थापन करण्याची जागा आहे. पण या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात होत नसल्यामुळे तेथील कचरा कुंड्यात सुका कचरा आणि ओला कचरा एकत्रच टाकल्या जातो व नियोजनाच्या अभावामुळे सेंद्रिय व कंपोस्ट खतात रूपांतर होत नाही. तसेच गावातील ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रच जमा करून बाहेर कुणीकडेही टाकला जात होता. शेतात जाणाऱ्या घाणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या.
त्यानंतर हिंदू स्मशानभूमीत कचरा डेपो चा ठराव घेण्यात आला . जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट होणार नाही तोपर्यंत संपूर्ण कोरपणा परिसरात अशाच प्रकारे घानीचे साम्राज्य दिसेल. प्रशासनाने पुढाकार घेऊन स्मशानभूमीत येणाऱ्या जाणाऱ्या समाजातील नागरिकांना आपल्या कोरपणा शहरातील प्रतिमा कशा प्रकारे दर्शविले जाईल यांचा विचार करावा. कचरा डेपोसाठी दुसऱ्या जागेचा विचार करावा अशी भावना हिंदू समाजाच्या लोकांची झाली आहे.
त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन कचऱ्याच्या विळख्यातून स्मशानभूमीला मुक्त करा. स्मशानभूमीला सुशोभीकरण करायचे सोडून आपण आणखी घाणीच्या साम्राज्यात ढकलण्याचा प्रताप सत्ताधारी वर्गाने केला आहे. त्यासाठी हिंदू मुस्लिम समाजातील तरुणांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.