कोरची :- पंचायत समिती कोरची अंतर्गत आज दिनांक 1 जुलै 2022 ला कै.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा वृक्षरोप, शाल श्रीफळ देऊन शेतकऱ्याचा पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी राजेश फाये ,तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी रेणू दुधे, तालुका कृषी अधिकरी विदया मांडलिक, सहायक प्रशासन अधिकारी सुचिता आस्कर सहाय्यक विस्तार अधिकारी कृषी देवानंद फुलझेले, प्रगतशील शेतकरी शंकर जनबंधु, महिला शेतकरी चप्पा बाई मोतीराम उईके ह्या होत्या. कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषी विभाग पंचायत समिती अंतर्गत गट विकास अधिकरी यांचे हस्ते जांभूळ, आंबा चे वृक्षरोप, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी विकासाच्या योजनाचा लाभ घेऊन उत्पनात वाढ करावी असे संबोधित केले तर प्रास्ताविकेत देवानंद फुलझेले विस्तार अधिकारी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा महत्व, शेतकरी संवाद या बाबत माहिती दिली तर प्रमुख अतिथी कृषी अधिकारी रेणू दुधे व तालुका कृषी अधिकारी विदया मांडलिक यांनी कृषी च्या योजनांची माहिती दिली. तर प्रगतशील शेतकरी शंकर जनबधु उत्तम शेती करण्याबाबत आपल्या अनुभवातून मनोगत विशद केले.
कार्यक्रमाचे संचालन विनोद गडपायले तर आभार प्रवीण लाटकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शीतल साडवे, प्रतिभा मडावी, दिगंबर, पेंट्टेवाड ,नितीन नैताम, प्रमोद मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरीउपस्थित होते.