राजुरा :- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर, आशादेवी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीस साठी 29 जून पासून विद्यार्थी शाळेत येत आहे हा दिवस प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साहपूर्ण व नाविन्यपूर्ण वाटावा यासाठी शाळेमध्ये विध्यार्थीचे भेटवस्तू व विविध स्पर्धा घेऊन त्यांना गौरविण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शालेय पोषण आहार वितरित करण्यात आला. वर्गखोल्यापुढे रांगोळ्या टाकून व फुग्यांचे आकर्षक गेट तयार करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे बदललेले रूप रंगरंगोटी बघून व वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असल्याचे मत सतीश धोटे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक मडावी यांनी केले. प्रास्ताविक दिपक सातपुते यांनी केले तर आभार सोनल नक्षीने यांनी मानले. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येत विद्यार्थी पालक उपस्थित होते. दिपक सातपुते यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. सोबतच जागतिक योगा दिनानिमित्त आभासी पद्धतीने योगा करणाऱ्या विद्यार्थिनीला पुरस्कृत केले व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून सेल्फी पाठवणार या विद्यार्थिनीला सुद्धा भेटवस्तू देण्यात आली. पुस्तक ओळख उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन पुरस्कृत करण्यात आले.
तसेच सेल्फी पॉईंट तयार करून सेल्फी काढण्याचा आनंद विद्यार्थांनी घेतला.