बीड (बुद्धभूषण रोडे) :-विदर्भातील सावंगी मग्रापूर ता.सांगवी जि.अमरावती या गावात जातीयवादातून दलितांच्या वस्तीचा पाणीपुरवठा स्थानिक उपसरपंचांनी बंद केला होता हा प्रकार महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेवर कलंक लावणारा आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राज्यात दलितांचा पाणी पुरवठा बंद केला जातो या अत्यंत निषेधार्ह बाब आहे. दलितांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रकार राज्यात पुन्हा कुठेही घडू नये यासाठी या गावातील दलीतांचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपाई चे प्रदेश उपाध्यक्ष तथा अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र जाधव यांनी तहसीलदार यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सावंगी मग्रापूर गावातील दलितांचा पाणीपुरवठा जातीवादी प्रवृत्ती च्या उपसरपंचाकडून बंद करण्यात आल्याची बाब गंभीर व मानवतेला काळीमा फासणारी असुन या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी निफाड तहसीलदार यांचेकडे केली आहे. सावंगी मग्रापूर मधील दलितांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा नळ तोडण्याचा प्रकार निषेधार्ह आहे हे प्रकरण गंभीर असून यातील आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असुन सदर निवेदनाची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले साहे, मुख्यमंत्री .उध्दव ठाकरे, राज्यपाल आदींना पाठविण्यात आल्या आहेत. सदर निवेदन त्वरीत राज्य शासनास पाठवले जाईल असे आश्वासन तहसीलदार यांनी शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात सर्वश्री वसंतराव वाघ, प्रदीपनाना गांगुर्डे, संजयबाबा गायकवाड, शशी जाधव, सुरेश डांगळे, विनोद गायकवाड, नितीन खडताळे, प्रमोद आहीरे, दिपक निरभवणे, अर्चना दरगुडे, मनिषा पवार, रेखा जाधव, ज्योती जाधव, शशीकांत अढांगळे, राजा सोनवणे, अशोकराव बागुल, गौतम पठाडे, प्रमोद शिंदे, करण सोनवणे, आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.