तालुका आरोग्य विभागाचे आयोजन
जिवती :- माणिकगड पहाडावरील अतीदुर्गम जिवती तालुक्यात आरोग्य विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जिवती तालुक्यातील शस्त्रक्रिया पात्र लाभार्थींना शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमू कडून प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत तपासणी होणार आहे. नागपूर येथून कान, नाक, घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ हजर राहतील. मंगळवारी १४ जूनला सकाळी १० ते १२ पर्यंत शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दुपारी १२.३० ते ३ पर्यंत डॉक्टर्स उपस्थित राहतील.
जिवती तालुक्यातील कॅन्सर, हर्निया, हायड्रोसिल, मोतीबिंदू, काचबिंदू, शरीराला असलेली गाठ, गर्भाशय व स्थनाचे आजार,मूळव्याध,भंगनदर, पांढरे पाणी जाणे, किडनी स्टोन, मूत्रशयाचे आजार तपासणी होईल. तपासणी नंतर शस्त्रक्रिया नागपूर येथे नि:शुल्क करण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी दिली.