भद्रावती :- स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी जीनत परवीन समादखां पठाण ही 82.83 टक्के गुण घेऊन भद्रावती तालुक्यात कला शाखेतून सर्वप्रथम आली आहे. त्याबद्दल तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, ग्रंथपाल डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. रामकृष्ण मालेकर, वरिष्ठ लिपिक सतीश मशारकर, ग्रंथालय परिचर श्रद्धा वऱ्हाडे, डॉ. यशवंत घुमे, मुलींचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाटे यांनी यशस्वी विद्यार्थिनीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
विवेकानंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 89.85 टक्के लागला आहे.