चंद्रपूर :- महा.राज्य.प्रा.शि.संघ वरोरा व जिवती तालुका अवघड क्षेत्र कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांच्या सन 2018 पासून रखडलेल्या बदल्या लवकरात लवकर करण्यात याव्या व बदली पोर्टल नवीन सत्र सुरू होण्याअगोदर सुरू करण्यात यावे त्याचप्रमाणे दुर्गम क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना न्याय द्यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनाची तात्काळ दखल घेऊन ग्रामविकास मंत्री नामदार हसिन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून शिक्षकांचे बदली पोर्टल लवकरच सुरू करण्यात येईल व रखडलेल्या बदली प्रक्रियेला लवकरच सूरूवात करण्यात येईल असे आश्वासान खासदार सुप्रिया सुळे यांनी संघटनेला दिले.मागील चार वर्षापासून बदली पक्रिया रखडलेली असल्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत होता.बदली पोर्टल नवीन सत्र सुरू होण्याअगोदर सुरू करावे व शिक्षकांच्या बदल्या तुरंत करण्यात याव्या याबाबत महा.राज्य.प्राथ.शिक्षक संघ वरोरा शाखेचे सरचिटनिस विजय सातपुते शिक्षक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ग्रामविकास मंत्री नामदार हसिन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला.
महा.राज्य.प्रा.शि.संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांना संघटनेमार्फत बदली संदर्भात कित्येकदा विजय सातपुते यांनी पत्रव्यवहार केला व यावर्षी कोणत्याही परिस्थितीत बदल्या व्हायलाच पाहीजे ही आग्रहाची भुमिका मांडली.
खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देतांना महा.राज्य.प्राथ.शिक्षक.संघाचे सरचिटनीस विजय सातपुते,अध्यक्ष अशोक टिपले,जिल्हाकार्याध्यक्ष सुनिल बुरीले,कृती समितीचे शिलेदार,अरूण देऊळकर,चर्तुभुज जाजू,नोमाजी झाडे,सुनिल कोहपरे,विपिन धाबेकर उपस्थित होते.