मुलचेरा:-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी 5 जून रोजी पेडिगुडम वनपरिक्षेत्र परिसरात येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम आले.यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे मुलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, सर्व वनपालव वनरक्षक उपस्थित होते.
5 जून ला दर वर्षी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो.यावर्षी सुद्धा जिल्ह्यात वन विभागाने विविध ठिकाणी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपापल्या क्षेत्रात विविध कार्यक्रम घेतले.पेडिगुडम वनपरिक्षेत्र कार्यालय स्थित मुलचेरा येथे मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय केला.एवढेच नव्हेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकी रॅली काढून पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत नागरिकांत जनजागृती केली व परिसरात स्वछता अभियान राबविली.
पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.शहराचे वाढते तापमान ही एक मोठी समस्या झाली आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले.