चिमूर:- तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र मधील पळसगाव मधील अतिक्रमणे काढलेल्या जागेवर झाडे लावण्याकरिता वनविभागाने रोपे मोठया प्रमाणात आणली गेली आहे.मात्र त्यांना मुबलक पाणी मिळत नसल्याने ती पाण्याविना कोमजले आहात.
पळसगाव येथील शेतकऱ्यांना उघड्यावर पाडून वनविभागाने अतिक्रमण काढले आणि त्या अतिक्रमण जागेवर लाखो रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्या साठी ट्रक द्वारे रोपे पण पळसगांव वनपरिक्षेत्र मध्ये आली त्यात गावा शेजारील जवळील अशोक चनफने यांच्यात शेतात काही रोपटे ठेवण्यात आली आहेत,मात्र ते पाण्या वाचून कोमेजून पडली आहेत काही झाडे पूर्ण जळली असल्याचे दिसत आहेत .अशी विधारक स्थिती असून लक्ष न देणाऱ्या कर्मचारी व बेफिकीर अधिकऱ्या मुळे फज्जा उडाला असून.तप्त उन्हात माणसाची लाहीलाही होत असतानाच त्या रोपाची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा, वनविभागाने रोपांना मुबलक पाणी न दिल्याने झाडे जळू लागली असून.आताच काही झाडे शेवटची घटका मोजत आहेत.त्यामुळे संबंधित अधिकारी वर कार्यवाही करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.दररोज उष्णतेमध्ये होणारी वाढ हवामानातील बदल हे वनविभागाने गांभीर्याने न घेता काही मजुरांच्या हस्ते त्या रोपावर वन कार्यलयात ड्रम ने पाणी आणून सळा शिंपल्या प्रमाणे पाणी शिंपणे सुरू आहे,वनविभागाने या वेळेस जनतेच्या सहभागातून त्या जागेवर रोपे लावण्याचे योजले आहे,मात्र झाडे लावण्यापूर्वीच झाडे कोमेजून गेली आहेत
ज्या ठिकाणी रोपे ठेवले आहेत त्या ठिकानी हिरवा नेट बांधली आहे.पाणी टाकणे सुरू आहे मात्र उन्हाचा तडाका जास्त असल्यामुळे काही झाडे करपली आहेत.रोपे मेली नाहीत त्याची काळजी घेत आहो.
आर एन ठेमस्कर
वनपरिक्षेत्र अधिकारी, पळसगाव