वरोरा :- ग्रामीण भागात लहान व युवा वर्गाच्या हातात संगणक व मोबाईल फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात पारंपारीक खेळाचा लोप पावत असल्याचे मत डॉ. अंकुश आगलावे यांनी विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व तालुका क्रीडा संकुल वरोराच्या वतीने 29 मे ला आयोजित खो. खो सामनाच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी व्यक्त केले.
डॉ आगलावे पुढे म्हणाले की विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्रीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबत ग्रामीण खेळानाही मोठे महत्व दिले जाते मात्र दिवसेदिवस खेळ बदलत जात असून लोप पावत असल्याचे दिसून येत आहे तसेच देशाचे भविष्य हे विदयार्थीच्या हातात असून खेळाच्या माध्यमातून भविष्य घडविता येते.
या कार्यक्रमाला संबोधित करतांना म्हणाले की देश भारतीय घटनेमुळे तर गांवाचा कारभार ग्रामगीता व्दारे चालतो तसेच संताने समाज जनजागृती करून समाज व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असे सांगितले त्यामुळे समाजातील गरीब घटकांतील वर्गानी आपले अस्तित्व निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात आपला पाय खंबीरपणे रोवला पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रतिभा धानोरकर, आमदार वरोरा विधानसभा क्षेत्र, तर अध्यक्ष म्हणून ॲड.मोरेश्वर टेमुर्डे माजी उपाध्यक्ष विधानसभा लाभले. सदरील कार्यक्रमास अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष, वरोरा, जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश जीवतोडे, राजु चिकटे माजी सभापती, अनिल झोटींग माजी उपाध्यक्ष नप. वरोरा, रविंद्र शिंदे संचालक सी.डी.सी.सी. बॅंक,चंद्रपूर, सिध्दार्थ पाटील सरपंच ग्रा.पं. शेगांव बु. , रोशन मकवाने तहसिलदार वरोरा, दिपक खोब्रागडे पोलीस निरीक्षक वरोरा, विजय ढोबाळे तालुका क्रीडा अधिकारी वरोरा, मोरे सचिव खो. खो फेडरेशन चंद्रपूर, सुधीरजी निंबाळकर सर सचिव विदर्भ खो-खो, तानाजी वायस्कर क्रीडा शिक्षक आनंदवन , सागर कोहळे ,रवी चरूरकर, धनराज रेवतकर अध्यक्ष अ.भा.प्रा.शि. संघ वरोरा , अशोक टिपले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमीक शिक्षक संघ वरोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.