सिंदेवाही वरून येणार सोळा गाठी बारदाना
वरोरा :- हमीभावाने चना खरेदीला शासनाने मुदतवाढ दिली परंतु बारदाना नसल्याने चना खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने चना उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले ही माहिती बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे यांना माहिती होताच त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधाला तेव्हा त्यांनी सिंदेवाही येथून सोळा गाठी बारदाना वरोरा येथे पाठविण्यास परवानगी दिली. त्यात चार हजार क्विंटल चना खरेदी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.
शासनाने चण्याला प्रति क्विंटल पाच हजार दोनशे तीस रुपये हमीभाव जाहीर केला. हमीभाव बाजारभावापेक्षा एक हजार ते दीड हजार रुपयांनी अधिक असल्याने शेतकऱ्यांनी हमी भावाने चना विक्रीस प्राधान्य दिले. १४७८ शेतकऱ्यांनी हमीभावाने चना विक्रीस प्राधान्य दिले ६७८ शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्यात आला ८०० शेतकरी प्रतीक्षेत असताना हमी भावाने चना खरेदी बारदाना अभावी बंद करण्यात आली आहे. हमीभावाने चना खरेदी ची मुदत २८ मे रोजी संपली परंतु शासनाने १८ जून पर्यंत हमीभावाने चना खरेदीस परवानगी दिली. मात्र मुदत वाढीनंतर बारदाना नसल्याने चना खरेदी बंद झाली. येत्या काही दिवसात पाऊस येईल परत मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याने बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे यांनी हमीभाव केंद्रावर भेट देऊन कर्मचाऱ्यांची चर्चा केली. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेता त्यांनी थेट जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व चना ऊत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सिंदेवाही येथे बारदाना च्या सोळा गाठी उपलब्ध असून त्या वरोरा येथे घेऊन जावे तसे आदेश दिले .एका दिवसात वरोरा येथे सोळा गाठी बारदाना उपलब्ध होणार असल्याने जवळपास चार हजार क्विंटल चना खरेदी होणार आहे .यानंतर उर्वरित बारदाना येत्या काही दिवसात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन माजी सभापती राजेंद्र चिकटे यांना दिले आहे .त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा चना हमीभावाने घेतला जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.