गोंडपिपरी-गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत भं तळोधी आहे.नुकताच गावाला स्वच्छ सुंदर गाव पुरस्कार मिळाला.गावातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद १५ वित्त आयोग १०% जिल्हा परिषद निधी अंतर्गत ई -रिक्षा वाहन उपलब्ध करून दिले.ई-रिक्षा वाहनाचे लोकार्पण दि.१७ मंगळवारी माजी जिल्हा परिषद सदस्या वैष्णवी बोडलावार,सरपंच लक्ष्मी बालुगवार,सदस्य जयेश कार्पेनवार,गीता बुरीवार,अर्चना कावळे ,ममता कोवे,चांदेकर,अनिता पोटे,मनोज सिडाम,कापकर,जितेंद्र रामटेके,नम्रता मोहूर्ले यांच्या उपस्थितीत लोकार्पण पार पडले.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ई रिक्षा वाहन ग्रामपंचायत ला प्राप्त झाली असल्याने गावातील कचऱ्याची समस्या आता सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.