• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

क्रीडा संकुलात भरणार यंदाचा मेला; क्रीडा विभागाचा हा कसला धंदा?

मागील वर्षी नकार, यंदा मात्र परवानगी; क्रीडा विभागाची ही कसली मनमानी...?

Suraj Ghume by Suraj Ghume
November 13, 2026
in चंद्रपूर
A A
0
क्रीडा संकुलात भरणार यंदाचा मेला; क्रीडा विभागाचा हा कसला धंदा?
Spread the Information

वरोरा : दिवाळीचा सण म्हटला की शहरात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि मेलांची रेलचेल सुरू होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही वरोरा आणि भद्रावती शहरात दिवाळीनिमित्त मेळ्यांचे आयोजन करण्यात आले. वरोरा येथे कल्पतरू सार्वजनिक संस्था, तर भद्रावती येथे रोटरी क्लबच्या वतीने मेळा भरविण्यात आला. मात्र, या मेळ्यांसाठी पुन्हा एकदा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानाची निवड करण्यात आल्याने क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

RelatedPosts

आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

विशेष म्हणजे, मागील वर्षी खेळाडूंच्या नियमित सरावाचा विचार करून दोन्ही शहरांतील मेळ्यांना क्रीडा संकुलाची जागा नाकारण्यात आली होती. मग यंदा अचानक असा कोणता बदल झाला की, त्याच मैदानावर मेळे भरविण्यास परवानगी देण्यात आली? शहरात इतरत्र जागा उपलब्ध असताना क्रीडा संकुलाचाच आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

क्रीडा संकुल हे खेळाडूंच्या सरावासाठी, स्पर्धांसाठी आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळण्यासाठी निर्माण करण्यात आलेले असते. मात्र, याच मैदानावर व्यावसायिक स्वरूपाचे मेळे भरविले जात असतील, तर नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी जायचे कुठे? मेळ्यांमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे आयोजकांना आर्थिक उत्पन्न मिळत असताना खेळाडूंच्या सरावाचा आणि मैदानाच्या मूळ उद्देशाचा बळी का दिला जात आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दोन्ही शहरांमध्ये क्रीडाप्रेमींनी मेळ्यांच्या परवानगीवर आक्षेप नोंदविला. वरोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनानंतर भविष्यात क्रीडा संकुलावर बिगर क्रीडा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, असा ठराव करण्याची भूमिका समोर आली. मात्र, यंदाचा मेळा त्याच मैदानावर भरविण्यात आला. मग भविष्यातील ठराव करून वर्तमानातील प्रश्न सुटणार आहे का? यंदा खेळाडूंच्या सरावात झालेल्या व्यत्ययाची जबाबदारी कोण घेणार?

मेळ्यांच्या प्रवेशद्वारावर झळकणारे राजकीय नेत्यांचे मोठमोठे फलक पाहता या आयोजनामागील राजकीय पाठबळाचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. प्रशासनाने निर्णय घेताना खेळाडूंच्या हिताला प्राधान्य दिले की राजकीय दबावाला, याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. क्रीडा विभागाने परवानगी देताना खेळाडूंची मते जाणून घेतली होती का? तसेच क्रीडा संकुलाचा व्यावसायिक वापर करण्यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का, याचीही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.

खेळाडूंसाठी उभारलेल्या मैदानावर मेळे भरविण्याचा हा प्रकार म्हणजे क्रीडा संकुलाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यासारखा आहे. आयोजकांचा कार्यक्रम, राजकीय प्रतिष्ठा आणि प्रशासनाची परवानगी यापेक्षा खेळाडूंचे भविष्य महत्त्वाचे नाही का? वरोरा आणि भद्रावतीतील नागरिक आज हाच सवाल विचारत आहेत.

क्रीडा संकुल खेळाडूंसाठी आहे की मेळ्यांच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी? क्रीडा विभागाने या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.

Tags: CHANDRAPURNational sportWarora
Previous Post

पिके उद्ध्वस्त, शेतकरी संकटात; भामरागडला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी जनआक्रोश!

Next Post

गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा दिमाखदार शुभारंभ!

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Next Post
गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा दिमाखदार शुभारंभ!

गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा दिमाखदार शुभारंभ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
११ महिन्यांचे काम सहा वर्षांपासून रखडले; वनविभागाच्या माथी खापर फोडून महामार्ग विभाग जबाबदारी झटकतोय का?

११ महिन्यांचे काम सहा वर्षांपासून रखडले; वनविभागाच्या माथी खापर फोडून महामार्ग विभाग जबाबदारी झटकतोय का?

November 14, 2026
गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा दिमाखदार शुभारंभ!

गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा राष्ट्रीय जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा दिमाखदार शुभारंभ!

November 14, 2026
क्रीडा संकुलात भरणार यंदाचा मेला; क्रीडा विभागाचा हा कसला धंदा?

क्रीडा संकुलात भरणार यंदाचा मेला; क्रीडा विभागाचा हा कसला धंदा?

November 13, 2026
पिके उद्ध्वस्त, शेतकरी संकटात; भामरागडला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी जनआक्रोश!

पिके उद्ध्वस्त, शेतकरी संकटात; भामरागडला दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी जनआक्रोश!

November 13, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1