• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती यवतमाळ

३० कुपोषित बालकांच्या संगोपनाची पंचायत समिती प्रशासनाने घेतली जबाबदारी

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मारेगाव तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी विशेष उपक्रम

Suraj Ghume by Suraj Ghume
October 1, 2026
in यवतमाळ
Reading Time: 1 min read
A A
0
३० कुपोषित बालकांच्या संगोपनाची पंचायत समिती प्रशासनाने घेतली जबाबदारी
Spread the Information

मारेगाव : (महेश खंगार) :- ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मारेगाव तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी पंचायत समिती प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील ३० कुपोषित बालकांना पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दत्तक घेत त्यांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानात कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी तालुक्यातील प्रत्येकी एका कुपोषित बालकाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत.
अधिकाऱ्यांकडून बालकांच्या घरी नियमित भेटी देऊन पोषण आहार, खानपानाच्या योग्य सवयी, स्वच्छता तसेच बालकांच्या आरोग्याची काळजी याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक सहकार्यही केले जात आहे.
या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य घेतले जात आहे. अधिकारी आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस संबंधित बालकांच्या घरी भेट देत असून, या भेटींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.
दरम्यान, तालुक्यातील सर्व ३० कुपोषित बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. बालकांच्या आरोग्यात होणाऱ्या सुधारणा, पोषण स्थितीतील बदल आणि अभियानादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाची वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली जाणार असल्याने मारेगाव तालुक्यातील कुपोषण निर्मूलनाच्या या सामूहिक प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बॉक्स……………
मारेगाव तालुक्यात तीस बालके कुपोषित असुन त्यांच्या संगोपणाची परिपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाने घेतली आहे. आरोग्य शिबीर आयोजित केले जाणार असुन त्यांच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली हे तपासले जाणार असुन योग्य औषध उपचारास मदत मिळणार आहे.
भिमराव व्हंनखंडे
गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव

RelatedPosts

शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे छोटा हत्ती पलटी, अनेक जखमी, कायद्याची पायमल्लीचा आरोप…..

विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ चा १०० टक्के निकाल

शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाचे सर्वोच्च प्राधान्य: चौहान

Previous Post

पंजाब काँग्रेसमध्ये मोठा नेतृत्वबदल; राजा वडिंग यांचा राजीनामा

Next Post

भर रस्त्यात एसटी बंद; ७० प्रवासी अडकले;अहेरी-सिरोंचा मार्गावर भंगार बससेवेचा पुन्हा फटका

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Next Post
भर रस्त्यात एसटी बंद; ७० प्रवासी अडकले;अहेरी-सिरोंचा मार्गावर भंगार बससेवेचा पुन्हा फटका

भर रस्त्यात एसटी बंद; ७० प्रवासी अडकले;अहेरी-सिरोंचा मार्गावर भंगार बससेवेचा पुन्हा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

मानव विकास, जिजाऊ योजनेतून अतिरिक्त बससेवेची मागणी

October 3, 2026
अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

अष्टभुजा वॉर्डात देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

October 2, 2026
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर

October 2, 2026
सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव; चार दशकांच्या माओवादविरोधी संघर्षाला पूर्णविराम

October 2, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1